WTC सामन्यापुर्वी भारतीय संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू होणार बाहेर?

WTC2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा फायनल अगदी काही दिवसांवर आला आहे. अशातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा फलंदाज केएल राहुल दुखापती मुळे संघातून बाहेर होणार असल्याची माहिती मिळत आहे. केएल राहुल आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा फायनल खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केएल राहुलला आरसीबीविरूद्धच्या समान्यात दुखापत झाली होती. तो आज चेन्नई सुपर किंग्जविरूध्दच्या सामन्यानतर स्कॅनसाठी मुंबईत येणार आहे. राहुलच्या दुखापतीने भारतीय क्रिकेट संघाचे टेन्शन वाढले आहे.
भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात ७ जून ते ११ जून दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आहे. या संघात अजिक्य राहाणेने पुनरागमन केले आहे. तर दुखापतग्रस्त ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांना टीम इंडियात स्थान मिळालेले नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिक्य रहाणे, विराट कोहली, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), आर आश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकट.





