Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कारागृहात जाण्याची इच्छा म्हणून पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी; युवकाला अटक

नवी दिल्ली |
पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याची धमकी देणाऱ्या एका २२ वर्षीय युवकाला दिल्लीच्या खजुरी खास परिसरातून अटक करण्यात आल्याचे शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीचे नाव सलमान ऊर्फ अरमान असे आहे. कारागृहात जाण्याची इच्छा असल्याने दूरध्वनी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सलमानला अमली पदार्थांचे व्यसन आहे.





