Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बुध्द जयंतीनिमित्त पालिका रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिकांचा सन्मान

Share On

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे सौदागर येथील दवाखान्यातील डॉक्टर, परिचारिका यांना कोविड योध्दा म्हणून प्रमाणपञ व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये   पिंपरी चिंचवड महानगरपालिका दवाखाना पिंपळे सौदागर येथे, डॉक्टर, परिचारिका यांना  कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मला कुटे,शांताराम भालेराव, राकेश भास्कर , आशिष जाधव उपस्थित होते, यावेळी डॉ. तपशाळकर, दिपा परदेशी, अर्चना भोकरे, सुनिता पवार, विद्या काटे, पुनम खुने, कुंदा जेथे, आशा घाडगे, पुजाका हरके, लाला खरात, बसवराज हिरेमठ, उमेश कांबळे, सौरभ जगताप यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे सूञसंचालन रोहिदास पाखरे यांनी केले. आभार सचिन कळसाईत यांनी मानले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button