पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आता होम क्वारंटाईन बंद -आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे |महाईन्यूज|
पुण्यासह काही जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशन १०० टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवण्यात येणार आहेत. यापुढे कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आयसोलेट करण्यात येईल. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. या जिल्ह्यामध्ये पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद समावेश आहे.
कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असलं तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोरोना चाचण्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्याच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.
तसेच सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे होम आयसोलेशन शंभर टक्के बंद करणे आणि रुग्णालयाचे फायर ऑडिट केले जाणार आहे.





