केंद्रीय अर्थ संकल्पातुन सर्वसामान्यांची निराशा – माजी आमदार विलास लांडे

केंद्रीय अर्थ संकल्पातुन सर्वसामान्यांची निराशा – माजी आमदार विलास लांडे

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोनाच्या नंतर मांडला गेलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठरेल अशी, अपेक्षा होती. मात्र सर्वसामान्य नागरिकांना निराश करणारा है अर्थसंकल्प आहे. नागरिकांना धीर धरायला लावणारा नसून धीर सोडायला लावणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत माजी आमदार विलास लांडे यांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे व्यक्त केले.

प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, पेट्रोल व डिजेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे. या दरावरील कर कमी होतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे न होता नवा कर नागरिकांच्या मानगुटिवर लादला आहे. प्राप्तिकर मर्यादा वाढेल अशी आशा नोकरदारांना होती. मात्र ती न वाढल्याने नोकरदारांचाही हिरमोड़ झाला आहे. मध्यम वर्गावर अर्थसंकल्पाने संक्रांत आणली आहे. भांडवलदारांचे हित जोपासले आहेत. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण हे त्याचे मोठे उदाहरण आहे. एलआयसीतील गुंतवणूक ७४ टक्के वाढवुन त्याचेही खासगिकरण केले आहे. एकूणच भविष्यात हा देश अदानी व अंबानी सारखे मोठे उद्योगपतीच चालवतील की काय असे चित्र असल्याचे मत माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *