Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांचं वक्तव्य, म्हणाले राष्ट्रवादीचीही ‘तीच’ भूमिका

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा अरोप झाल्यानंतर विरोधकांकडून मुंडे यांच्यावर घणाघाती टीका होत असून त्यांच्या राजीनाम्यची मागणी विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी “धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर यापूर्वीच खुलासा केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष नवाब मलिक यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे,” असं म्हटलंय. मलिक यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची असल्याचंही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय.

“मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर त्यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिलंय. प्रांताध्यक्ष नवाब मलिक यांनीही भूमिका मांडली आहे. या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. मलिकांनी भूमिका मांडली तीच भूमिका राष्ट्रवादी पक्षाची आहे,” असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button