Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ठाणे, नाशिक, बीडमधील शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये, थोरातांच्या उपस्थितीत प्रवेश

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक पक्षांतून इनकमिंग आऊटगोईंग सुरू झाले आहे. यातच काल ठाणे, नाशिक व बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेसने 135 वर्षात खूप चढ उतार पाहिले आहेत पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या पाहता काँग्रेस पुन्हा एकदा दिमाखाने उभारी घेईल, असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

थोरात यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूरचे माजी आमदार महादू बरोरा यांचे चिरंजीव दत्तात्रय महादू बरोरा. नाशिक जिल्हा भाजप कोअर कमिटी सदस्य कैलास वसंतराव आव्हाड, नाशिक जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष अमीन पठाण, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शरीफ गफार शेख, युवा मोर्चाचे अध्यक्ष तौफीक जाकीर पठाण. बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवि ढोबळे. मराठा आरक्षण समितीचे संयोजक बीडचे नामदेव लगड, तसेच, विजय पवार, प्रविण लगड, अस्लम शेख, शामराव यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

थोरात यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, यशवंत हाप्पे, राजाराम देशमुख, दादासाहेब मुंडे, विनायक वाजपेयी, शरद आहेर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button