Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडी
“मी भाजपात प्रवेश केला असता तर…”; काय म्हणाले अब्दुल सत्तार

शिवसेनेचे नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नंदुरबारमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी “मी भाजपात प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती”, असं ते म्हणाले. शिवसेना प्रवेशावर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समाधान व्यक्त केलं.
राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात, तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या ठरली असती, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला होता. चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते.




