Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी पराभव स्विकारून राजीनामा द्यावा, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Share On

कोल्हापूर – पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे हा पराभव स्विकारून चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता भाजप पक्षातूनच होऊ लागली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील खरंच राजीनामा देणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वाचा :-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदारांचा सभात्याग

चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केली आहे. त्यासोबत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

वाचा :-निवडणुकीआधी सरपंच पदाच्या आरक्षणाला ‘खो’

चंद्रकांत पाटील यांनीही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, असा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button