पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवसानिमित्त साफसफाई कामगारांचा भाजपतर्फे सत्कार

शहर भाजपा सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त लाॅकडाऊनमध्ये ‘कोरोना’ या संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता स्वच्छतेसाठी अमूल्य योगदान व सेवाकार्य करणा-या ‘70 मनपा सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक’ यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी प्रभाग 18 च्या वतीने चिंचवडगावातील ‘गोखले हाॅल’ येथे करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड महानगराचे जिल्हा कार्यवाह विलासराव लांडगे यांच्या हस्ते मनपाच्या 70 सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ’देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘स्वयं-समर्पन, सेवा भाव व प्रखर राष्ट्रभक्ती’ संघाच्या या संस्कारातून घडलेलं एक शक्तीशाली नेतृत्व आहे’, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड महानगराचे जिल्हा कार्यवाह विलासराव लांडगे यांनी याप्रसंगी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्थानिक नगरसेवक व शहर भाजपा सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे व चिंचवड-किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी लोकमान्य रूग्णालयाचे डाॅ.श्रीकृष्ण जोशी, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, ब’प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजयुमोचे शहर सरचिटणीस, भाजपा सचिव मधुकर बच्चे, शिक्षक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह प्रशांत आगज्ञान, गणेश गावडे, स्वप्निल देव, पराग जोशी, केदार बावळे, वरद देव, श्रीकांत जोशी, महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी प्रास्ताविक केले व अजित कुलथे यांनी सुत्रसंचालन तर चिंचवड-किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे यांनी आभार मानले





