शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण

नाशिक | शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गोडसे यांनी आपल्या ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे खासदार आहेत.
“आज माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी.!” असे आवाहन हेमंत गोडसे यांनी केले आहे.
“मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरु ठेवेन आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या !” असेही गोडसे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
“आता कोरोनासोबत जगणे स्वीकारले पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जिल्ह्याचा कोरोनाचा आलेख वाढत असताना मतदारसंघातील विकास कामे, शासकीय बैठका तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देणे गरजेचे असल्याने माझे काम सुरु होते.” अशी माहितीही गोडसेंनी दिली.




