सर्व पक्षांचा सरकारच्या तिजोरीवर दरोडा, ही लूट थांबावी: राजू शेट्टी

नाशिक | सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, ही लूट थांबली पाहिजे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, मंदिर, मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्यांसाठी आंदोलन करा, भक्तांची काळजी करा असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला.
शेट्टी म्हणाले की, गाईचा छळ केला असा माझ्यावर गुन्हा दाखल केलाय, आम्ही गाईचा छळ कसा करणार. दुधाला दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन करतोय, मात्र त्याबाबत गुन्हा दाखल होतोय तो होऊ द्या आंदोलन सुरूच राहणार, असंही ते म्हणाले. सरकार ज्यावेळी दूध खरेदी करते तेव्हा भाव मिळाले पाहिजे पण राज्यात दुधाचे भाव कमी होत आहेत. सुशांतसिंग आत्महत्याची चर्चा होते, मात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणी कोणीच चर्चा करत नाही हे दुर्दैव आहे, असंही शेट्टी म्हणाले.





