Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

Video: रवी जाधवने स्वत:ला तयार केला बाप्पा; माती ते मुर्तीचा त्याचा प्रवास पहा

सध्या सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. बाप्पा येऊन विराजमान झाले आहे. मात्र हे 10 दिवस बाप्पाचं स्वागत, बाप्पाला आवडणारा फराळ , सजावट हे सर्व सुरुच राहणार आहे. यंदा कोरोनामुळे गणपती बाप्पाचं आगमन साध्या पद्धतीने कराव लागलं असलं तरी उत्साह आणि आनंद मात्र तोच आहे. दरवर्षी प्रमाणे बाप्पाच्या आगमनाची तयारी सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीही करत आहे. बाप्पा सर्वांच्याच लाडका असतो. यंदा गणेशोत्सवासाठी लागू केलेल्या नियम-अटींमुळे बऱ्याच जणांनी घरीच बाप्पाची छोटी मुर्ती बनवण्यावर भर दिला आहे. त्यात  चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता रवी जाधव याने सुद्धा घरीच छोटूसा मातीपासून गणपती तयार केला आहे. त्याच्या व्हिडिओ देखील बनवला आहे.

गणपतीला मस्त जास्वंदाच्या फुलाचा लाल रंग बाप्पाला दिला आहे. मस्त सोनारी दागिन्यांनी सजवलं आहे. आणि आज विराजमान करून त्याची पुजाही केली आहे. लाल रंगामध्ये बाप्पाचं रुप अगदी खुलून दिसतयं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button