पनवेलमध्ये शेकापला खिंडार, पाच नगरसेवक भाजपमध्ये

पनवेलमध्ये शेकापला खिंडार, पाच नगरसेवक भाजपमध्ये

पनवेल | रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं थोडंफार अस्तित्व असलेल्या भागातच राजकीय भूकंप झाला आहे. पनवेलमधील नगरसेवक हरीश केणी यांच्यासह पाच नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. शेकापचे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला अक्षरशः खिंडार पडले आहे. भाजप कार्यालयात दुपारी पाच नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे. माजी पालमंत्री रवींद्र चव्हाण, रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, महेश बालदी उपस्थित राहणार आहेत. पनवेल महापालिकेत शेकापचे 23 नगरसेवक आहेत. यातील चौघा जणांनी आधीच शेकापला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेत भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

दरम्यान, हरीश केणी यांनी पक्ष सोडताना शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा जयंत पाटील आणि स्थानिक नेतृत्वावर जोरदार टीका केली. शेकापमध्ये पैसेवाल्याना पदे दिली जात असून फक्त कॉन्ट्रॅकरनाच न्याय दिला जात असल्याचा आरोप नगरसेवक हरीश केणी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *