Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, सरकारविरोधात होणार मराठ्यांचा एल्गार

पुणे: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलेला आहे. राज्यभरातील विविध मराठा संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. 19 ऑगस्ट रोजी पुण्यात मराठा संघटनांची गोलमेज परिषद होणार आहे. त्यामुळे प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक होणार हे आता निश्चित झालेलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं असलं तरीही हा आरक्षण प्रश्न आता सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप याआधीच काही मराठा संघटनांनी केलेला होता. तसंच मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतही सरकारवर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा सरकारसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वाढलेली आहे.





