Breaking-newsताज्या घडामोडी
कोल्हापुरात सकाळीच कोरोना रुग्णांच्या संख्येचे शतक पार
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊन कितीही वाढवला तरी कोरोनाचा प्रसार काही थांबता थांबेना. आज सकाळीच आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने शतक पार केले. आज गुरुवारी सकाळी हाती आलेल्या ताज्या अहवालानुसार जिल्ह्यात १०२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
आज सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या कोल्हापूर शहरात होती. शहरात आज ५३ कोरोना रुग्ण सापडले. त्याखालोखाल हातकणंगले – २२, करवीर – १३, राधानगरी – ६, शिरोळ – ५, भुदरगड – १, पन्हाळा – १, रत्नागिरी – १ अशी कोरोना रुग्णांची संख्या आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याची सध्या हॉटस्पॉटकडे वाटचाल चालली आहे.





