Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
‘दिल्लीत छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, भाजप आणि संभाजी भिडे शांत का?’- संजय राऊत

मुंबई: भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेच्या शपथविधीवेळी घडलेल्या प्रसंगावरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. या वादात आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतलेली आहे. राऊत यांनी ट्विट करुन म्हटलेले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झालेले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली-सातारा बंदची अदयाप घोषणा देखील नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केलेली आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही…
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2020
जय भवानी!
जय शिवाजी!!!!!!!





