#CoronaVirus: राज्यातील कारागृहांना कोरोनाचा विळखा, 655 कैद्यांसह 211 कर्मचाऱ्यांना बाधा

#CoronaVirus: राज्यातील कारागृहांना कोरोनाचा विळखा, 655 कैद्यांसह 211 कर्मचाऱ्यांना बाधा

पुणे: राज्यातील कारागृहाच्या अभेद्य भिंती ओलांडून कोरोनानं शिरकाव केलेला आहे. राज्यातील कारागृहात आतापर्यंत 655 कैद्यांना कोरोना बाधा झालेली आहे. तर 446 कैदी कोरोनामुक्त झालेले आहे. तर चार कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जेल स्टाफमधील 211 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 164 कैदी कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कैद्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अंतर्गत तात्पुरत्या कारागृहातील कैद्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

येरवडा कारागृहातील कैद्यांचा कोरोनापासून बचावासाठी तात्पुरतं कारागृह तयार करण्यात आलं आहे. या कारागृहात 17 कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. तर एका कोरोना बाधित कैद्याचा मृत्यू झाला आहे. तर कारागृह स्टाफमधील तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचसोबतच अपर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक कार्यालयात ही कोरोना रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणी पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर एक कर्मचारी कोरोनामुक्त झाला. माञ येरवडा मध्यवर्ती कारागृह कोरोनापासून अद्याप दूरच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *