Breaking-newsताज्या घडामोडी

पेट्रोल डीझेलची दरवाढ जनहितासाठी तत्काळ मागे घ्यावी – सोनिया गांधी

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मंगळवारी पत्र पाठवले आहे. कोरोना व्हायरस आणि इतर कारणांमुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी स्तरावर गेल्या. तरीही भारत सरकारने पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहित लक्षात घेऊन इंधन दरवाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्रातून केली आहे. कच्च्या तेलाचे दर इतके कमी झाले असताना सरकारला त्याचा प्रचंड नफा होत आहे. तरीही जनतेला याचा फायदा मिळवून देण्यापेक्षा त्यांच्यावरच ओझे का टाकले जात आहे हे कळत नाही असेही सोनिया गांधींनी लिहिले आहे. सोनिया गांधींनी सांगितल्याप्रमाणे, पेट्रोल आणि डीझेल दरवाढीचा निर्णय एक असंवेदनशील निर्णय आहे.

जनतेच्या हितांना वाळीत ठेवून सरकार स्वतःचा फायदा करून घेत आहे. एक्साइस शुल्क दिवसेंदिवस वाढवले जात आहे त्यासोबतच इंधन दरवाढ करून सरकार अतिरिक्त 2.6 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल गोळा करू पाहत आहे. देशातील जनता अतिशय वाइट परिस्थितीला सामोरे जात आहे. कोराना संकटात लोक घाबरलेले आहेत. वाढत्या समस्यांमुळे त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. इंधन दरवाढ करण्यात काहीच औचित्य नाही. यामुळे, विनाकारण देशाच्या जनतेच्या पाठीवर ओझे वाढवले जात आहे. सरकारने अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय घ्यायला हवे. जनतेचा ताण कमी कसा होईल यावर लक्ष केंद्रित करायला हवे. पण, उलट सरकार जनतेला संकटात टाकत असल्याचे चित्र आहे असेही काँग्रेसने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group