Breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! पहिल्या पत्नीला सोडून अल्पवयीन मुलीशी विवाह

पहिल्या पत्नीचा छळ करुन तिला माहेरी हाकलून देण्यात आले होते.  नंतर एका अल्पवयीन मुलीशी नवऱ्याने दुसरा विवाह केला आहे. टाळेबंदीच्या काळात ही घटना घडली असून नेवासे पोलीस ठाण्यात या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अंमळनेर (ता.नेवासे) येथील रामदास सोन्याबापू बाचकर यांची मुलगी संगिता (वय ३०) हिचा विवाह जांभळवाडी (ता. संगमनेर) येथील महादू खंडू खेमनर याच्याबरोबर २४ मार्च २००८ रोजी अंमळनेर येथे झाला होता. लग्नानंतर दोन वर्ष सासरच्या लोकांनी चांगले नांदविले. मात्र त्यानंतर छळ सुरु केला. संगीता हिचे वडील बाचकर हे तिला घरी घेऊन आले.

तेव्हापासून ती माहेरीच राहते. टाळेबंदीच्या काळात दि.२६ मे रोजी संगीता हिचा पती महादू खंडू खेमनर याने खुपटी येथे महादेव मंदिरात एका अल्पवयीन मुलीशी विवाह केला. या प्रकरणी पहिली पत्नी संगीता खेमनर हिने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. पोलिसांनी खंडू बायजी खेमनर, गंगूबाई खंडू खेमनर,  रखमा खंडू खेमनर, जालिंदर खंडू खेमनर (रा. साकूर, जांभूळवाडी, ता.संगमनेर), धोंडीबा लक्ष्मण पुणेकर (रा.डिग्रस, ता.संगमनेर) तसेच अल्पवयीन मुलीचे आई वडील व मामा अशा नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा व बेकायदा दुसरे लग्न करणे आदि कलमान्वये नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षक रोहीदास डेरे अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button