चक्रीवादळामुळे अन्नधान्य, भाजीपाला महागला

चक्रीवादळामुळे अन्नधान्य, भाजीपाला महागला

पश्चिम बंगालला अम्फन चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आता कोलकातामधील अन्नधान्य, भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. चक्रीवादळासमवेतच आलेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ातील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे, असे संबंधितांनी सांगितले.

चक्रीवादळाचा पुरवठय़ावर विपरीत परिणाम झाला असून बहुसंख्य भाज्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत आणि त्यामध्ये आणखीही वाढ होण्याची शक्यता आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत भाजीपाल्याच्या पुरवठय़ावर आणखी परिणाम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *