Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
निर्मलाकाकू… तर संपूर्ण भारतदेश ‘ड्रामेबाज’ आहे : जितेंद्र आव्हाड

मुंबई| महाईन्यूज | प्रतिनिधी
स्थलांतरित मजुरांच्या बाजूला बसून त्यांच्या भावना आणि व्यथा जाणून घेतल्या, अशा आशयाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांना ‘ड्रामा बाजी’ म्हणून टीका केली होती.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्रत्युत्तर दिले आहे.
श्री. आव्हाड यांनी म्हटले आहे की, स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे ,त्यांच्या बरोबर चालणे.. राहुल गांधींची ड्रामा बाजी आहे, असे निर्मलाअक्कांचे म्हणणे आहे
जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामा बाजी आहे तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे
माणुसकी इथे व्यक्त होतेच!





