Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उमेदवारी नाकारल्यानं खडसे भडकले!

जळगाव | विधानसभेनंतर आता विधान परिषदेची उमेदवारीही नाकारण्यात आल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कमालीचे चिडले आहेत. ‘मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसं झालं असतं तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे. भाजप कुठल्या दिशेनं चाललाय,’ असा त्रागा खडसे यांनी आज व्यक्त केला.विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.

यापैकी चार जागा निवडून आणण्याची संधी भाजपला आहे. चारही जागांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी चौघांचाही पत्ता कापून पक्षानं नव्या चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button