Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | १०२ वर्षीय वृद्ध महिलेची कोरोनावर मात

लंडन | कोरोना व्हायरसमुळे जगात सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मृतांचा आकडा देखील मोठा आहे. त्यात कोरोना या धोकादायक आजारातून सुखरूप  वाचणाऱ्यांची देखील संख्या समोर येत आहे. नुकताच लंडनमध्ये चक्क १०२ वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनावर मात केली आहे.

ही महिला आता पूर्णपणे बरी झाली आहे. तिला घरी देखील पाठवण्यात आलं आहे. यासंबंधी माहिती लंडनच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे. १०२ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. माध्यमांच्या म्हणण्यानुसार या वृद्ध महिलेवर लिव्हरपूलच्या एंट्री रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात कोरोना रुग्णांपैकी ही सर्वात वृद्ध महिला होती. त्यामुळे कोरोना पासून आपण वाचू शकतो. फक्त गरज आहे ती म्हणजे आत्मविश्वासाची. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group