Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला करोनाची बाधा

करोना विषाणूमुळे जगभरासह देशभरात सध्या थैमान घातले आ्हे. राज्यात देखील करोना बाधित रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबई व पुणे ही प्रमुख शहरं यामध्ये अग्रस्थानी आहेत. आज तर पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्यांच्या आईला करोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.





