Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus |औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २० वर

औरंगाबाद | शहरात आणखी दोन करोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले असून, आता शहर व जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या २० इतकी झाली आहे. शुक्रवारी शहरातील २९ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयानं दिली आहे.
घाटी व जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी दिवसभरात ९७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, तर ६१ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, एन ९५ मास्कच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाच्या २००४ या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सध्याच्या आंतरवासिता व निवासी डॉक्टरांना दीड लाख रुपये किंमतीचे ६०० मास्क शुक्रवारी दिले.




