ताज्या घडामोडी

दिवे पेटवण्यामागील मोदींच्या हेतूचं स्वागतच करायला हवं – रोहित पवार

मुंबई : दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं, अशा शब्दात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी एकप्रकारे पाठिंबा दर्शवला आहे. आधी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केल्याने पक्षात दोन गट पडल्याचं चित्र आहे. ‘दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं.

अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button