Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

निझामुद्दीनमधील तब्लिगीने डॉक्टरांवर थुंकून केली शिवीगाळ|Tablighi Jamaat spit at Quarantine Centre

Share On

नवी दिल्ली | निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढलं जात असताना तब्लिगींचा मस्तवालपणा पाहायला मिळाला. दिल्लीत ‘कोरोना’ चाचणी घेणाऱ्या डॉक्टरांवरच काही तब्लिगी थुंकल्याचं समोर आलं आहे. काही जणांनी तर डॉक्टरांना शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.

निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढलेल्या काही तब्लिगींना हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत. क्वारंटाइन केलेल्या काही जणांनी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत थुंकण्याचा किळसवाणा प्रकार केला. निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या 167 जणांना तुघलकाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेलं आहे. तर 97 जणांना रेल्वेच्या डिझेल शेड ट्रेनिंग स्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. 70 जणांना आरपीएफच्या बॅरेकमध्ये क्वारंटाईन केल्याची माहिती उत्तर रेल्वे विभागीय मंडळाचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button