Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

#CoronaVirus: बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध गायिकेलाही कोरोनाची लागण,ती राहत असलेल्या इमारतीचेही करण्यात येणार विलगीकरण

Share On

जगभरात कोरानाची लागन झालेल्यांमध्ये अनेक मोठे चेहरेही आहे…त्यामध्येच आता बॉलिवूडमधली प्रसिद्ध गायिका कनिका कपूरलाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे…

कनिका आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी लंडनमधून लखनऊमध्ये काही  दिवसांपूर्वीच आली होती. तिनं आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला मोठी पार्टीही दिली होती. शुक्रवारी  उत्तरप्रदेशमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेले एकूण चार नवे रुग्ण समोर आले आहेत यामध्ये कनिकाचाही समावेश आहे.  एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे…

तिच्या पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात व्हीआयपी पाहुणे उपस्थित होते यात नेतेमंडळी आणि काही सेलिब्रिटींचाही समावेश असल्याचं समजत आहे.  त्यामुळे इथल्या स्थानिक यंत्रणेसमोर नवा पेच उभा राहिला  आहे. कनिका उत्तरप्रदेशमधल्या एक आलिशान इमारतीमध्ये राहते. तिच्या संपूर्ण इमारतीचेच विलगीकरण करण्यात येणार आहे. 

या पार्टीसाठी उपस्थित असलेल्या काही लोकांनी स्वत: पुढाकार घेऊन त्यांची आरोग्य चाचणी करण्याची मागणी केली आहे, मात्र यातले अनेकजण व्हीआयपी आहेत त्यांच्या चाचण्या कशा कराव्यात  असा पेच  इथल्या अधिकाऱ्यांना पडला आहे, अशी माहिती  इथल्या रुग्णालयातल्या एका अधिकाऱ्यानं दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button