Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

संघात पुनरागमन करण्यासाठी बीसीसीआयची धोनीपुढे फक्त एकच अट

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आता तो भारताच्या संघात पुन्हा दिसणार की नाही, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पण धोनीला जर भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याच्यापुडे बीसीसीआयने फक्त एकच अट ठेवली आहे.ती अट म्हणजे आयपीएलमध्ये त्याला चमकदार कामगिरी करायला लागणार आहे . जर धोनीला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याच्यासाटी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धोनीने भारताला आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकवून दिल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली आणि २०११ साली वनडे विश्वचषकाला गवसणी घातली. त्यामुळे धोनीचा अनुभव नेहमीच भारतीय संघासाठी मोलाचा ठरतो.

त्यामुळे बीसीसीआयनं धोनीपुढे ठेवलेल्या अटीनुसार आता तो पुर्णपणे तयारीला लागला आहे…आणि त्यात धोनीला नक्की यश मिळेन यात काहीच शंका नाही…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group