Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?’- शिवसेना

Share On

मुंबई | महाईन्यूज

दिल्लीत लष्कराला पाचारण केल्याचे वृत्त आले व लष्करी वेशातील लोक दंगलग्रस्त भागात तैनात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. लष्करी पोशाखातील शेकडो जवानांचे संचलन जाफराबाद परिसरात झाले, पण “हे आमचे लष्कर नाही’’ असा खुलासा लष्कराच्या अधिकृत प्रवक्त्याने केला. मग दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण? असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून विचारलेला आहे.

तसेच याआधी ‘बुरखा’ वगैरे घालून भाजपची एक कार्यकर्ती शाहीनबाग आंदोलकांच्या गर्दीत घुसली होती. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या पोशाखात व मुखवटय़ात फिरत आहेत ते समजायला मार्ग नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने अशा भयपटाने व्हावे हे बरे नाही. अहमदाबादमध्ये ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब! दिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती असा टोलाही शिवसेनेला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button