Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांनी दिल्या ट्विटर अकाउंट ‘Propose Day’च्या मजेशीर शुभेच्छा…

एखाद्याला सरळ सांगून जी गोष्ट पटत नाही ती थोडे टोमणे मारून सांगितली की आपोआप पटते, हा एक सर्वसाधारण अनुभव आपण साऱ्यांनी घेतला असेल, याचा वापर करून महाराष्ट्र पोलिसांनी साऱ्यांना एक इशारा दिला आहे.

काल पासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे, आज या वीक मधील प्रपोज डे आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाची कबुली देऊन त्याच्या तिच्या साथीसाठीची मागणी यादिवशी केली जाते. याच दिवसाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटर अकाउंट वरून एक मजेशीर ट्विट करण्यात आले आहे

“#ProposeDay ला आयुष्याचा जोडीदार शोधा, गुन्हेगारीतला भागीदार नाही” असे हे ट्विट आहे. यासोबतच ट्विट मध्ये #ChooseWisely #ProposeDay2020 हे हॅशटॅग सुद्धा लिहिण्यात आले आहे. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रियाही आलेल्या पहायला मिळतायत…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button