Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटींचे घोटाळे – जयंत पाटील

Share On

नागपूर | महाईन्यूज

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे, याबाबत कॅगने सुद्धा ताशेरे ओढले आहेत, असे सांगत या प्रकरणाची दखल घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मीडियासोबत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार कोटींचा गोंधळ असून आर्थिक घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांवर कॅगने ताशेरे ओढले आहेत.

आमचे सरकार चौकशी सरकार नाही, पण जे रेकॉर्डला आहे, त्याची आम्ही दखल घेणार आहेत. तसेच, कॅगच्या मुद्द्यांची नोंद घ्यावी लागणार आहे.” याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजेच अजित पवार निर्दोष आहेत. हे त्यांना माहीत होते असे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच, भाजपाने अजित पवार यांच्यावर 5 वर्षे खोटे आरोप केले आणि ते एसीबीने सुद्धा सिद्ध केले, असेही म्हणत जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button