Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“त्यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं”, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : नीट पेपरफुटीच्या प्रकरणानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत एका महिन्यापासून आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या घडामोडींवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. ‘धर्मेंद्र प्रधान यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं, हेच एका खऱ्या भाजपा कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे’, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे.

“धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांची अंमलबजावणी केली. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ लागू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ‘पीएम श्री’ शाळांचा उपक्रम, आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणा त्यांनी अंमलात आणल्या. व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत त्यांनी आज (२५ जुलै) राजीनामा सादर केला. त्यांनी (धर्मेंद्र प्रधान) वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं, हेच एका खऱ्या भाजपा कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजपा परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा –  पुणे घाट प्रदेशात अतिमुसळधार पावसाचा इशारा; विदर्भावर पुढील तीन दिवस वादळी पावसाचा प्रभाव

गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (२५ जुलै) शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं बोललं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यावर माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा विद्यार्थी चळवळीपासून सुरू झालेला प्रवास आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचं कार्य यावर प्रकाश टाकत चव्हाणांनी त्यांचं कौतुक केलं.

“धर्मेंद्र प्रधान यांनी भारताचे शिक्षण मंत्री म्हणून आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांचा विद्यार्थी चळवळींशी असलेला जुना संबंध आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचं योगदान लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. राजकीय प्रवासात तरुणांच्या अपेक्षा, चिंता आणि आकांक्षांशी इतक्या जवळून जोडलेले खूप कमी नेते पाहायला मिळतात. शिक्षण क्षेत्राचा पाया मजबूत करण्यासाठी आणि देशातील शैक्षणिक व्यवस्थेला भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी प्रामाणिक प्रयत्न केले”, असं चव्हाणांनी म्हटलं.

“नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं, त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button