Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
नवाब मलिकांकडून महाराष्ट्राची दिशाभूल;- राम कदम

महाईन्यूज | मुंबई
नवाब मलिक हे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहीर आहेत. आमदारांना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले ही सरकारची नियोजन शून्यता आहे आणि कामकाज सल्लागार समिती ही आमदारांना तारांकित प्रश्नांपासून रोखण्यासाठी नव्हती, असं वक्तव्य भाजपाचे नेते राम कदम यांनी केलं आहे. राज्य सरकार हे विकासविरोधी असून सरकारच्या कामाची पद्धत ही अजबच आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. प्रश्नोत्तराचा तासही होणार नाही व सरकारनं आमदारांना प्रश्न दाखल करण्यापासून रोखलेलं आहे, असा आरोप राम कदम यांनी केला होता.





