Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
“अरे शहाण्या तू…”; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना फटकारलं

मुंबई |
करोना काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मास्क आणि इतर काळजी घेण्यासाठी नेहमी सतर्क असतात. काल (शनिवार) कर्जत-जामखेड दौऱ्यावर गेल्यानंतर तिकडे कोणीही मास्क वापरत नसल्याचे अजित पवारांना दिसले. जे लोक मास्क वापरत नाहीत ते बरोबर नाही जर तीसरी लाट आली तर मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. यावेळी बोलतांना त्यांनी थेट आमदार रोहित पवार यांना फटकारलं आहे.
“करोनाचा सामना करण्यासाठी मास्क वापरण आवश्यक आहे. कर्जत जामखेडला अनेकजण मास्कचं वापरत नव्हते. रोहितचं मास्क वापरत नव्हता. मी त्याला सांगितलं, अरे शहाण्या तू आमदार आहे. तू आधी मास्क वापर. त्यानंतर मला बाकीच्यांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही आणि तुम्ही मास्क वापरत नाही. हे बरोबर नाही.”, असे अजित पवार म्हणाले.





