Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

दिल्ली विद्यापीठातही आता राष्ट्रवादीचा ‘झेंडा’; विद्यार्थी पॅनेलने मारली बाजी

Share On

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक

महाराष्ट्रातील ऐतिहासिक कामगिरीसाठी पवारांचा सन्मान

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम ।

नवी दिल्ली येथील विद्यापीठ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी पॅनेल निवडून आले. विद्यार्थी सेलच्या या कामगिरीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कौतूक केले.

दरम्यान, निवडणुकीत विजयी झालेल्या पॅनेलच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया धुहान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना आगामी वाटचालीसाठी पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये झंझावती प्रचारामुळे पक्षाध्यक्ष पवार राजकीय इतिहास लिहिला, या झळाळत्या कामगिरीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी ‘राजकारणाचे हिंद केसरी’ या उपाधीने पवार यांचा सन्मान केला आणि त्यांना हरयाणवी लठ व गदा भेट दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button