Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हातकणंगलेतील माले मुडशिंगीत सापडले 69 गावठी बाॅंब, दोघांना अटक

कोल्हापूर – माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ६९ गावठी बाँब जप्त केले असून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बाँब निर्मितीचे साहित्य जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचे येथील उजळाईवाडी उड्डाणपूल तसेच हुबळी रेल्वेस्थानकातील स्फोटाशी काही कनेक्‍शन आहे का, याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. या प्रकरणी विलास राजाराम जाधव आणि आनंदा जाधव (दोघे रा. माले मुडशिंगी, हातकणंगले) यांना अटक केली आहे. या बाँबचा वापर शिकारीसाठी होत असल्‍याची माहिती आहे.

त्यानंतर संशयित विलास जाधव व आनंदा जाधवला ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली. त्यात गावठी बाँब तयार करण्याच्या साहित्यासह पांढऱ्या व गडद तपकिरी रंगाचे ६९ जिवंत गावठी बाँब सापडले. ते जप्त करण्यात आले आहेत. संशयित विलास व आनंदाकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. यात त्या दोघांनी घरातच हे बाँब तयार करत असल्याचे सांगितले. त्यासाठी ते सल्फर, पोटॅशियम पावडर, गारगोटीचे खडे आदींचा वापर करत होते. हे बाँब शिकारीसाठी वापरले जातात. त्याला प्राण्यांच्या रक्ताचे आवरण लावून त्याआधारे रानडुकराची शिकार केली जात असल्याची कबुलीही दोघांनी दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक संतोष पोवार, सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक रमेश ढाणे, किशोर डोंगरे, कर्मचारी संतोष माने, कृष्णात पिंगळे, सोमराज पाटील, संजय पडवळ, सचिन पाटील, किशोर सूर्यवंशी, हरीश पाटील, राजेंद्र घारगे, मनोहर कोळी, राजेश राठोड, संदीप पावलेकर, लक्ष्मण धायुगडे आदींनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group