Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीडमध्ये भाजपला दे धक्का, पंकजा मुंडे यांच्या खंद्या समर्थकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

बीड | महाईन्यूज

भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक कल्याण आखाडे यांनी भाजपला अखेरचा रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. महामंडळाचे अध्यक्ष पद न दिल्यामुळे आखाडे यांची पंकजा मुंडेंवर नाराजी होती, असे सांगण्यात येते. याचा बीड जिल्ह्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कल्याण आखाडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपात 13 वर्ष काम केलं. मुंडेंच्या हयातीनंतर देखील पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना साथ दिली. त्यानंतर भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली. सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी आखाडे यांनी केली होती. यावर पंकजा मुंडें यांनी आश्वासनही दिले होते. मात्र, पाच वर्षात त्यांनी आश्वासन पाळले नसल्याचा गंभीर आरोप करत कल्याण आखाडे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

कल्याण आखाडे यांनी पंकजा मुंडे यांना महामंडळावर अध्यक्ष करा, अशी मागणी केली होती. तसेच, त्यांनी याच मागणीवर भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, पंकजा मुंडेंनी महामंडळावर घेतलं नसल्याने नाराज झालेले आखाडे थेट राष्ट्रवादीच्या आखाड्यात गेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button