Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बारामती शहरात कडकडीत बंद

पुणे, महाईन्यूज,

शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्याचे पडसाद आज राज्यभर उमटू लागले आहेत. आज बारामती शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.

शहरातील बाजारपेठ बंद आहे. दैनंदीन व्यवहार देखील बंद ठेवले आहेत. सरकारने ही कारवाई सुडबुध्दीने केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या समर्थकांनी राज्यभरात भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. बारामती शहरात राष्ट्रवादीचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. सरकारचा निषेध करत भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group