प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारा, राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आवाहन

प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारा, राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर आवाहन

बीड – मागील काही वर्षांपासून पक्षापासून दूर असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात भाजपच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारण्याचे आवाहन केले. यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबतचे सर्व सबंध तोडल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील एका मंगल कार्यालयात आज जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात जिह्यातील सर्व तालुक्यातील त्यांचे समर्थक उपस्थित होते. मेळाव्यात माजी मंत्री आ. क्षीरसागर राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ज्या पक्षाच्या उभारणीत झोकून देऊन काम केले त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज दारावर उभे केले आहे. पक्षात वारंवार होणाऱ्या अन्यायामुळे आता वेगळी भूमिका घ्यावी लागत आहे. याउलट युती सरकारने बीड जिल्ह्यास विकासासाठी भरपूर प्रमाणात निधी दिला, विकासाच्या मुद्द्यांवर भाजप-सेना महायुतीच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विजयाची गुढी उभारा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *