Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड

Share On

यवतमाळ : ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुप्रसिध्द लेखिका अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमत झाले आहे.  ११ ते १३ जानेवारी दरम्यान हे संमेलन विदर्भातील यवतमाळ येथे होणार आहे.

प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या आहेत. ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन केलेले आहे. सहा कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button