Breaking-newsपिंपरी / चिंचवड

फोनवर बोलत चाललेल्या तरुणीचा विनयभंग; आरोपी अटक

पिंपरी :- महिला फोनवर बोलत रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 16) आंबेडकर वसाहत जवळ निगडी येथे घडली. यामध्ये आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार 27 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकाच भागात राहतात. रविवारी रात्री नऊच्या सुमारास तरुणी आंबेडकर नगर येथे रस्त्याने पायी जात होती. दरम्यान तिला फोन आल्याने ती फोनवर बोलत जाऊ लागली. त्यावेळी आरोपीने तिच्याजवळ येऊन फोनचा आवाज वाढविण्यास सांगितले. तसेच कोणाशी बोलतेस अशी विचारणा केली. घाबरलेली तरुणी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देता जात होती. तेंव्हा आपल्या कोणत्याच प्रश्नाची उत्तरे न दिल्याने चिढलेल्या तरुणाने तरुणीशी अश्लील चाळे केले. यावरून तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी तरुणाला तात्काळ अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button