Breaking-newsमहाराष्ट्र

मोदी शिवसेनेच्या खासदारांचा नमस्कारही स्वीकारत नाहीत

खासदार गजानन कीर्तीकर यांचा आरोप

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शिवसेना सहभागी असली तरी केंद्रात मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिवसेनेच्या खासदारांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. सभागृहात मोदींना नमस्कार केल्यावर ते पाहतसुद्धा नाहीत. सध्या आम्ही  सोबत असलो तरी यानंतर मात्र शिवसेना हा अपमान कदापि सहन करणार नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार आणि पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी मोदींवर टीका केली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कीर्तीकर यांची पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी नागपुरात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता.

अमित शहांच्या मातोश्री भेटीचा उपयोग नाही

मोदींच्या एककल्ली कारभाराचा केवळ शिवसेनेलाच अनुभव नाही. अकाली दल, तेलगू देशम या सरकारमधील प्रादेशिक पक्षांनाही आला आणि म्हणूनच तेलगू देशम सरकारबाहेर पडले. दुय्यम वागणूक सहन होत नसल्याने प्रादेशिक पक्ष भाजपपासून वेगळे होत आहेत. त्यामुळे २०१९ ची निवडणूक भाजपसाठी कठीण आहे. मोदी लाट केव्हाच संपली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर येऊन बरोबर राहण्याची भाषा करीत असले तरी  शिवसेनेने मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही कीर्तीकर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button