Breaking-newsराष्ट्रिय

क्षुल्लक कारणामुळे आईची चिमुकल्याला अमानुष मारहाण

Share On

आपल्याच चिमुकल्याला निर्घृणपणे मारहाण करणाऱ्या आईचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यापासून मारहाण करणाऱ्या निर्दयी आईविरोधात संताप व्यक्त होत आहे.

हरियाणातील सिरसा येथील ही घटना आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला ४ वर्षाच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी अमानुषमणे मारहाण करताना दिसत आहे. मुलगा जोरजोरात रडत असतानाही ही निर्दयी आई त्याच्या पोटात आणि पाठीत लाथा मारताना दिसतेय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिमुकल्याने बिछान्यावरच शौचक्रिया केली म्हणून संतापलेल्या निर्दयी आईने ही अमानुष मारहाण केली.

चिमुकल्याच्या आजीने केलेल्या पोलीस तक्रारीनंतर ही घटना समोर आली असून, त्या आजीने मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील पोलिसांना दिला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची चौकशी सुरू आहे, अशी माहिती सिरसाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button