Breaking-newsराष्ट्रिय

धक्कादायक! दारू पिण्यापासून रोखलं, बायकोची जीभच कापली

Share On

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज परिसरात एका व्यक्तीने शुक्रवारी रात्री आपल्या पत्नीची जीभ कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी नवऱ्याला मनाई केली व त्यावरुन ती त्याला बडबड करत होती, परिणामी संतापलेल्या पतीने थेट पत्नीची जीभ कापली. संबंधीत महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी पतीची ओळख पटली असून शकील अहमद (४०)असं त्याचं नाव आहे. सध्या आरोपी फरार आहे. मजुरी करणाऱ्या शकीलच्या घरात दोघांशिवाय चार मुलं आहेत. त्याला अंमलीपदार्थाचं सेवन आणि दारुचं व्यसन जडलं होतं , त्यामुळे पती-पत्नीमध्ये खटके उडत असत. शुक्रवारी रात्रीही दोघांमध्ये दारुच्या व्यसनावरुन खटके उडले , जोरजोरात भांडण सुरू असताना संताप अनावर झालेल्या शकीलने कात्रीच्या सहाय्याने थेट पत्नीची जीभच कापली.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पती फरार आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button