Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढत्या गैरप्रकारांमुळे महापालिकेचे “बर्ड व्हॅली” उद्यान बदनाम  

  • नागरिकांकडून गैरप्रकाराला खतपाणी
  • सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • पालिका, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
  • नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

 

पिंपरी – महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून बर्ड व्हॅलीसारखे शहरातील उत्कृष्ट असे पर्यटन केंद्र विकसित केलेले आहे. परंतु, हे पर्यटन केंद्र गुन्हेगारीशी संबधित घटना व दैनंदिन होणा-या गैरप्रकारांमुळे बदनाम होत आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

 

यासंदर्भात नगरसेविका गोरखे यांनी प्रसिध्दीसाठी इमेलद्वारे माहिती कळविली आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये टेल्को रस्त्यालगत बर्डव्हॅली उद्यान आहे. या उद्यानातील खाणीच्या तलावात मागील आठवड्यात एका २५ वर्षीय तरुणाचा मृतेदह आढळला होता. यापूर्वी अनेकवेळा या उद्यानात उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वारंवार अशा घटना घडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा फटका पालिकेला बसत असल्याने अनुराधा गोरखे यांनी बर्ड व्हॅली उद्यानाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

 

कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेने हे उद्यान विकसित केले. पिंपरी-चिंचवड शहराबरोबर पुणे व इतर ठिकाणाहूनही लोक आवर्जून भेट देण्यासाठी येतात. मात्र, तेथे घडणा-या अप्रिय घटनांमुळे हे पर्यटन स्थळ बदनाम झाले आहे. या परिसरात आत्महत्या, खून, मारामाऱ्यासारख्या घटना घडतात. या उद्यानात येणा-या तरुण-तरुणींकडून गैरप्रकार केले जातात. या गैरप्रकारामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह नागरिक बर्डव्हॅली उद्यानात जाणे टाळतात, असे गोरखे यांनी नमूद केले आहे.

 

या ठिकाणी सुरक्षाविषयक आवश्यक काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. उद्यानातील साधनांची दुरावस्था झालेली आहे. पालिकेमार्फत देखभाल दुरुस्ती, सुरक्षेचे काम ठेकेदारांना दिले आहे. मात्र, ठेकेदार पैसे घेऊनही नीट काम करत नाहीत. योग्य कामे केली जात नसून उलट येणा-या पर्यटकांना येथील ठेकेदारी कर्मचा-यांकडून अरेरावी केली जाते. उद्यानातील सुविधा व उपाययोजनांबाबत सुधारणा होणे गरजेचे आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने पालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी अनुराधा गोरखे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group