Breaking-news

जेटली यांच्यावर किडनी रोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर आज दिल्लीच्या एम्स या सरकारी रूग्णालयात किडनी रोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जेटली यांना किडनी दान करणारा आणि स्वत: जेटली या दोघांचीही प्रकृती आता उत्तम आणि स्थिर आहे अशी माहिती रूग्णालयाच्या सूत्रांनी आज दिली.

या शस्त्रक्रियेसाठी जेटली यांना शनिवारी रूग्णलयात दाखल करण्यात आले होते आज सकाळी त्यांच्यावर आठ वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. 65 वर्षीय जेटली यांची किडनी निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून डायलॅसिस करावे लागत होते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्याला किडनीचा आजार असल्याने आपण लंडन येथील भारत- ब्रिटन इकॉनॉमिक चर्चेला उपस्थित राहु शकणार नाही असे स्वत: जेटली यांनीच मध्यंतरी ट्‌विटरवर सांगितले होते.

गेल्या काही दिवसांतील आजारामुळे ते स्वत:च्या घरातूनच अर्थमंत्रालयाचा कारभार पहात होते. त्यांना मधुमह असल्याने गेल्याच वर्षी त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यावेळी मॅक्‍स रूग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांना एम्स मध्येच दाखल करावे लागले होते. खूप पुर्वी त्यांच्यावर ह्दयशस्त्रक्रियाही झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button