breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात २ लाख ५७ हजार नवे रुग्ण, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २९ लाखांवर

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही नव्या रुग्णसंख्येत आता थोडीफार घट दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५७ हजार २९९ नवे कोरोना रुग्ण सापडले असून दिवसभरात ४ हजार १९४ बाधितांनी आपले प्राण गमावले आहेत. तर, कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 630 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 62 लाख 89 हजार 290 वर गेला आहे. देशात 2 कोटी 30 लाख 70 हजार 365 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 95 हजार 525 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 29 लाख 23 हजार 400 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,57,299

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,57,630

देशात 24 तासात मृत्यू – 4,194

एकूण रूग्ण – 2,62,89,290

एकूण डिस्चार्ज – 2,30,70,365

एकूण मृत्यू – 2,95,525

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 29,23,400

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,33,72,819 ( Corona Cases In India 24 hours)

Sharing is caring!

Facebook
Pinterest
Twitter
Google+
Related Posts:
फायझरनंतर मॉडर्नाचीही लस तयार! इमर्जन्सी वापराची मागितली परवानगी
100 दिवसांत 10 कोटी नागरिकांना कोरोना लस देणार! ज्यो बायडन यांची घोषणा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल
…तर मास्क घालण्याची गरज नाही; अमेरिकेच्या नव्या गाईडलाईन्स
Tags: Corona,Corona update from India,corona virus,covid,COVID19

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button