breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यातील २८ खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा आरक्षित

अकोला : जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, शासकीय वैद्याकीय महाविद्याालयांवरील ताण कमी करण्यासाठी शहरातील २८ रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २१ मेच्या अधिसूचनेनुसार कोविड व अन्य रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा आरक्षित करण्यासोबतच त्या रुग्णांचा औषधोपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व सर्वोपचार रुग्णालयात जागा अपुरी पडत आहे. शहरातील खासगी रुग्णालये व त्यांच्याशी संलग्नित सर्व कर्मचारी व अधिकारी चमू सकट सेवा उपलब्ध करून घेणे आवश्यक असल्याचे अधिष्ठातांनी कळवले.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालामध्ये नमुद केलेल्या रुग्णालयामध्ये ‘नॉन-कोविड’ रुग्णांसाठी शुल्क आकारणी करून रुग्णालयांची सेवा उपलब्ध करणे शक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी विविध बाबींवरील दरानुसार शुल्क आकारणी करून नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्ण दाखल करून घेणे, मार्गदर्शक सूचनानुसार उपचार करणे, नॉन कोविड रुग्णांना संदर्भित केल्यानुसार भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अकोला शहरातील खासगी रुग्णालय, त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचाºयांच्या सेवांसह क्षमतेच्या ८० टक्के खाटा आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.

खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
शहरातील खासगी रुग्णालयांच्या खाटा आरक्षित केल्यानंतर त्या ठिकाणी नॉन कोविड रुग्णांना उपचार सुविधा उपलब्धतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक व अधिष्ठातांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्याकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button